Shipping calculated at checkout.
फिट रहायला आणि आकर्षक दिसायला कुणाला आवडत नाही? कॉलेजमध्ये मित्र-मैत्रीणींसोबत लेटेस्ट फॅशनचे कपडे घालायला तर तुम्हाला विशेष आवडत असेल. पण जर शरीराने तुम्ही फिट नसाल तर...?
निराश होऊ नका! नमिता जैन या विख्यात फिटनेस गुरू खास तुम्हा तरुणांसाठी या पुस्तकाव्दारे एक अनोखा 'फिटनेस मंत्र' देत आहेत. या मंत्रामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होईल, तुम्हाला चांगल्या आहाराची सवय लागेल, व्यायामाची गोडी लागेल व मानसिक संतुलनही लाभेल. लठ्ठपणाशी फाईट कशी द्यावी? स्टॅमिना कसा वाढवावा? टीनएज समस्यांना तोंड कसं द्यावं? अशा समस्यांचं उत्कृष्ट मार्गदर्शनही त्यांनी या पुस्तकात केलं आहे.
उत्तम आरोग्य, नितळ त्वचा आणि आकर्षक फिगरसाठी प्रभावी 'फिटनेस मंत्र' टीनएजर्ससाठी!
'हे पुस्तक म्हणजे तरुणांसाठी एक खजिनाच आहे. जितकं तुम्ही वाचाल, तितकी त्याची उपयुक्तता तुम्हाला पटेल. उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती याचा प्रत्यय देणारं पुस्तक...'
-सायना नेहवाल
'या पुस्तकातला फिटनेस मंत्र अमलात आणा, त्यामुळे तुम्हाला हवा तसा मस्त आकार शरीराला देता येईल. माझ्यावर विश्वास ठेवा हा मंत्र खरोखरच जादुई आहे.'
-दीपिका पदुकोण