Fantastic Feluda Black Set (4 Books)
Fantastic Feluda Black Set (4 Books)
Shipping calculated at checkout.
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ना सर्व वयोगटातील वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने ‘रोहन प्रकाशन’ घेऊन आलं आहे – फेलूदाच्या एकूण ३५ कथांपैकी शेवटच्या ११ थरारक कथांचे ४ नवीन संग्रह; त्यातल्या या २ कथा...
१. ‘भारत ऑपेरा’ या नाटक कंपनीत काम करणारे इंद्रनारायण आचार्य एके दिवशी फेलूदाकडे मदत मागायला येतात. इतर कंपन्यांचे मालक आपल्या कंपनीत येण्यासाठी आचार्यांना मोठमोठ्या ऑफर्स देत असतात. त्यामुळे त्यांची मन:स्थिती द्विधा झालेली असते. कारण भारत ऑपेराने त्यांना मानसन्मान दिलेला असतो, त्यांची काळजी घेतलेली असते. हा दोन गटांचा संघर्ष कोणत्याही थराला जाईल, अशी भीती आचार्य यांना वाटत असते; होतंही तसंच! आणि मग आचार्यांच्या खुनाचं प्रकरण अधिकच गूढ-गहिरं होत जातं...
२. ख्यातनाम चित्रपटकर्ता पुलक घोषाल यांनी लालमोहनबाबूंच्या एका कादंबरीवर चित्रपट तयार करायचं ठरवलेलं असतं. त्यात लालमोहनबाबूंना लहानशी भूमिकाही दिलेली असते. शूटिंग दार्जिलिंगला असल्याने लालमोहनबाबू फेलूदा आणि तपेशलाही सुट्टी घालवण्यासाठी तिथे घेऊन जातात. फेलूदाही एकही काम न स्वीकारता, सुट्टीची मजा लुटायची असं ठरवतो. पण ज्या घरात त्यांचं शूटिंग होणार असतं, त्या घराच्या मालकाचा खून होतो आणि मग फेलूदाला दार्जिलिंगमधील खुनाचं रहस्य सोडवावंच लागतं!