Regular price
Rs. 495.00
Regular price
Rs. 550.00
Sale price
Rs. 495.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी लाभलेली ही रहस्यमय कादंबरी आहे. जर्मनीचा गुप्तहेर डाय नाडेल, इंग्लंडमध्ये फेबर या नावाने वावरतोय. त्याच्या मार्गात आडवं येणार्यांना आणि काही निरपराध व्यक्तींनाही ठार मारण्याचं सत्र आरंभलंय त्यानी. एमआय १५ही ब्रिटिश गुप्तहेर संघटना आणि पोलीस यांना तो गुंगारा देतोय. काही महत्त्वाचे फोटो जर्मनीला पाठवण्यासाठी तो पोहचू पाहतोय पोर्तुगालला; पण चक्रीवादळामुळे तो पोचतो एका बेटावरच्या घरात. त्या घरातील पांगळा सैनिक डेव्हिडला तो ठार मारतो. त्याची सुंदर पत्नी ल्युसी आणि डायमध्ये शारीर आकर्षण निर्माण होतं; पण डायने डेव्हिडला ठार मारल्याचं ल्युसीला समजतं आणि आपला व आपल्या तीन वर्षाच्या मुलाचा जीव धोक्यात असल्याची तिला जाणीव होते. डाय कोण आहे, हे तिला समजतं. मग तिच्यात आणि डायमध्ये निर्माण होतो जीवघेणा संघर्ष. ल्युसी आणि तिचं बाळ वाचतात का डायच्या तावडीतून? ते फोटो जर्मनीपर्यंत पोचवण्यात डाय यशस्वी होतो का? चित्तथरारक पाठलागाची उत्कंठावर्धक कथा.