Out of Stock
Shipping calculated at checkout.
राज कपूरची लाडकी लेक आणि उद्योजक राजन नंदा यांची प्रिय पत्नी…. पण एवढीच होती का रितूची ओळख ? तर नाही…हे पुस्तक वाचल्यावर जाणीव होते की, रितूची ओळख कित्येक कोस या पलीकडची आहे.सुप्रसिद्ध संपादिका व लेखिका सत्या सरन यांनी रितूच्या आयुष्याचा धांडोळा रसाळ भाषेत सखोलतेने घेतला आहे. शिवाय त्यांनी रितूचे कुटुंब सदस्य, जवळचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, व्यवसायातले सहकारी, इलाज करणारे डॉक्टर्स आणि अनेक सुहृद यांना बोलतं करत तिचं असामान्य कर्तृत्व,व्यक्तिमत्त्वातले अनेक पैलू, स्वभावातल्या बारीक छटा यांचा उलगडा केला आहे…. यातूनच समजतं….मृदु मनाची रितू एक उत्तम गृहकर्तव्यदक्ष गृहिणी तर होतीच; पण त्याचबरोबर ती स्वतः एक कल्पक व मेहनती उद्योजिका होती आणि कठीण प्रसंगांना धैर्याने भिडणारी, आयुष्याला सामोरी जाणारी कणखर स्त्री होती.तिचीच ही प्रेरणादायी कहाणी एक होती रितू…