Shipping calculated at checkout.
प्रदर्शन झालं, भिंतीवरची चित्रं ज्याच्यात्याच्या घरी गेली, की पोटात खड्डा पडतो : ... आता पुढे काय? मग आठवणी खरवडायला सुरुवात होते. खपल्या निघतात. मनात रुतून राहिलेले अनुभव... भिंतीवर खिळा ठोकावा तशा नजरेत ठोकल्या गेलेल्या इमेजेस... मी लगोरी लावायला लागतो. दगड एकमेकांवर रचतो, पुन्हा मोडतो, पुन्हा रचतो. काही म्हणता काही मनाला येत नाही. लगोरी उभी राहात नाही! या धडपडीतच ठेचकाळून मला माझ्या वाटा सापडत गेलेल्या आहेत. हरेक चित्रकाराला मिळालेला हा एक दैवी शाप आहे. डिव्हाईन कर्स! सब्जेक्ट... फॉर्म... काँपोझिशन्स.. कलर्स... टेक्श्चर्स... सतत शोधत राहायचं. लगोर्या लावत बसायचं. सुटका नाही. ती त ड फ ड सोसावीच लागते. बुडाखाली जाळ पेटलाय आणि डोक्यातल्या पातेल्यात काहीतरी शिजत घातलंय. अशी अवस्था! त्या चटक्यांचे काही तुकडे !