Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 117.00
Regular price Rs. 130.00 Sale price Rs. 117.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Shipping calculated at checkout.

Author
Publication
Language
आपल्यासमोर ‘नोकरीविरहित’ जगाचे भीषण वास्तव उभे ठाकले आहे. ही काही तात्पुरत्या स्वरूपाच्या मंदीची अवस्था नाही, तर ही ‘नोकरी’ नामक अस्तित्वाचीच अखेर आहे. शिवाय आजच्या वेगवान युगात परिवर्तनाला सामोरे जातानाच उच्च दर्जाची कामगिरी घडवून दाखवण्याचाही प्रचंड दबाव आहे. नोकरीच्या जोखडातून मुक्त झालेल्यांसाठी ‘कामा’चा मुक्त प्रवाह सुरू झाला आहे. त्यातून करिअरचे असंख्य नवे झगझगीत मार्ग उजळत आहेत. या टप्प्यावर वैयक्तिक स्वाभाविक कल, क्षमता व अर्थव्यवस्थेच्या नव्या गरजा यांना अनुरूप असे समृद्ध करिअर घडवण्यासाठी हे पुस्तक मोलाचे मार्गदर्शन करते. उपयुक्त व्यवहार्य सूचना, उदाहरणे, सोपी तंत्रे सांगणारे हे पुस्तक लेखकाच्या व्यवस्थापन क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवावर आधारित आहे. आपापल्या क्षेत्रात यशस्वीतेची शिखरे गाठणाNया सामन्यांतून असामान्य व्यक्तिमत्त्वांचा प्रेरणादायी करिअर-आलेखही या पुस्तकात पाहायला मिळतो. नोकरीवर आधारलेल्या पारंपरिक बाजारपेठेत नोकरी कशी शोधावी, याबाबत मार्गदर्शक पुस्तके उपलब्ध आहेत, पण नोकरीविरहित अर्थव्यवस्थेत टिकाव धरून राहण्यासाठी मार्गदर्शन करणारे साहित्य फारसे उपलब्ध नाही. हे पुस्तक ही उणीव भरून काढते.
In today`s world, the worst problem is unemployment. This phase is not a temporary one; on the contrary it is going to end the era of `service`. Today`s world is the most speedy one, on the top of it, we have to prove our abilities constantly, we are continuously expected to be the best. On the other hand, those who have been freed from the `service` have joined a new path, they are working freely. This has given rise to various modes of career. This book will prove to be an excellent guide; it will help each one considering the personal abilities, aptitudes, attitudes, and the new rising needs of finance. It is full of practical guide lines, examples, and easy techniques. The best part of it is based on the vast experience of the author in this field. You will also come across the graph of people who have been the best in their respective career fields. Like other books in the market, this one also guides about how to find a job in a traditional market based upon services, but the peculiarity of this book is it also guides about how to stand firmly in a `service-less` finance system.
View full details