Out of Stock
Shipping calculated at checkout.
सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडित:। मथितार्थ : सगळ्याचा नाश होण्याची वेळ आली, तर शहाणा मनुष्य अर्ध्याचा त्याग करतो (आणि उरलेल्या अर्ध्याचा स्वीकार करतो). * फाळणीचे मूलकारण कोणते होते? * जिनांनी द्विराष्ट्रवाद फाळणीसाठी मांडला होता की अखंड भारतासाठी? * फाळणीऐवजी येणा-या अखंड भारताची राज्यघटना कशा स्वरूपाची राहणार होती? * राष्ट्रवादी मुसलमानांना कोणत्या स्वरूपाचा अखंड भारत पाहिजे होता? त्यांचा फाळणीला विरोध कशासाठी होता? * अखंड भारतात तीन विषयांपुरते तरी ५६५ संस्थानांचे विलीनीकरण झाले असते काय? * हैदराबाद संस्थानाचे काय झाले असते? * ‘‘फाळणी झाली नसती, तर सर्व भारतच पाकिस्तानच्या मार्गाने गेला असता!’’ असे सरदार पटेल का म्हणाले होते? * आणि १९५५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘‘जर भारत अखंड राहिला असता, तर हिंदूंना मुसलमानांच्या दयेवर जगावे लागले असते... मुसलमान शासनकर्ती जमात बनली असती... जेव्हा फाळणी झाली; तेव्हा मला वाटले की, परमेश्वराने या देशावरील शाप काढून घेतला असून हा देश एकसंघ, महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.’’ बुद्धिवादी आंबेडकरांनाही येथे परमेश्वराचे नाव का घ्यावे लागले? **अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात नव्वद वर्षांच्या स्वातंत्र्याच्या व फाळणीच्या इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी करणारा, फाळणीकडे पाहण्याचा परंपरागत दृष्टिकोनच बदलून टाकणारा, राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून निर्भीडपणे लिहिलेला विचारप्रवर्तक ग्रंथ. '