Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
``आपल्या प्रिय व्यक्ती आपल्यापासून हिरावून मृत्यूच्या दाढेत फेकल्या जातात आणि तरीही आपण जगतच राहतो.`` २१ जुलै १९४२ रोजी नाझी सैन्यानं पोलंडवर आक्रमण केलं आणि झोक्लीव या छोट्या गावातल्या पंधरा वर्षीय ज्यू मुलीचं, क्लारा क्रेमरचं आयुष्य बदलून गेलं. तिचे मित्र-नातेवाईक ठार केले जात असताना किंवा आगखान्यात जळून खाक होण्यासाठी नेले जात असताना, क्लारा नि तिचे कुटुंबीय एका तळघरात लपून जीव वाचवण्यासाठी झगडले. तेदेखील कुठं तर वरकरणी ज्यूद्वेष्टा वाटणाऱ्या बेक नावाच्या जर्मन माणसाच्या घराखाली.साठ वर्षांनंतर आता क्लारा क्रेमर तिची करुण कहाणी सांगते आहे. सतत मृत्यूच्या सावलीत जगणाऱ्या क्लाराच्या या विलक्षण आठवणींमध्ये क्रौर्य, भीषण हत्याकांडे आणि नाझींच्या सैतानी प्रवृत्तीची छाया हे सगळं असलं, तरी अखेर ही कहाणी आहे एका तरुण मुलीच्या दुर्दम्य आशावादाची आणि धैर्याची.