Regular price
Rs. 536.00
Regular price
Rs. 595.00
Sale price
Rs. 536.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
किरणजीत अहलुवालियाची कहाणी ही फार भयानक आणि धक्कादायक असली, तरी कहाणीचा शेवट मात्र विजयोत्सवाचा आहे. अतिशय कठीण आणि संकटाच्या परिस्थितीतही जगण्याची दुर्दम्य इच्छा आणि आशावादाचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच ही जीवनगाथा! भारतातल्या एका सधन कुटुंबात जन्मलेली किरणजीत अहलुवालिया विशेष परिचित नसलेल्या माणसाशी विवाह करण्यास म्हणून १९७९ मध्ये इंग्लंडला आली. ती एक हसरी, खेळकर आणि आशावादी स्वभावाची, सुखी वैवाहिक जीवनाची स्वप्नं रंगवणारी तरुणी होती; परंतु लग्न झाल्याच्या दिवशीच तिच्या लक्षात आलं होतं की कुठेतरी, काहीतरी बिनसलेलं होतं. पुढचा दहा वर्षांचा काळ म्हणजे क्रूर पतीकडून सतत होणारी शारीरिक मारहाण आणि मानसिक छळ असा एखाद्या भयानक स्वप्नाप्रमाणे होता. ती कोणालाही मदतीसाठी विनवू शकत नव्हती. कारण ब्रिटनमधल्या आशियाई वंशाच्या बहुतेक स्त्रिया, कौटुंबिक आणि वैवाहिक अत्याचार हा विषय चर्चिला जाणं, हे निषिद्ध मानतात. घराची इज्जत, अब्रू, घराण्याचं नाव यालाच प्रमुख महत्त्व दिलं जातं. अनन्वीत छळामुळे आणि अत्याचारांनी ग्रस्त झालेल्या, सहनशक्तीची सीमा संपलेल्या किरणजीतनं तिला जगणं नकोसं करून सोडणाऱ्या नवऱ्याला १९८९ मध्ये शेवटी मारून टाकलं. खटल्याच्या कामकाजातलं तिला विशेष असं काही समजायचं नाही. अखेरीस खुनाच्या आरोपावरून दोषी ठरवून तिला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. नंतर ‘साऊथहॉल ब्लॅक सिस्टर्स’ या बेताच्या आर्थिक मदतीवर चालणाऱ्या संघटनेने चळवळ सुरू करून तिच्या खटल्याच्या कामातील त्रुटी आणि उणिवा जनतेसमोर आणल्या. तिच्या खटल्याने देशभराचं लक्ष वेधून घेतलं आणि शेवटी १९९२ मध्ये तिची सुटका झाली. सुटका झाल्यानंतर किरणजीत एकदा प्रिन्सेस ऑफ वेल्स (राजकुमारी डायना) ला भेटली. तेव्हा तिने किरणला तिच्या जीवनातल्या अनुभवांवर पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त केलं. ‘सर्कल ऑफ लाईट’ हेच ते पुस्तक! सद्य परिस्थितीमधलं एका वादग्रस्त आणि ज्वलंत विषयाच्या स्वानुभवाचे बोल म्हणजे हे पुस्तक होय. किरणजीत अहलुवालियाचा हा खटला खरंच खूप वैशिष्ट्यपूर्ण असून, ब्रिटनमध्ये सध्या वास्तव्य करणाऱ्या अनेक स्त्रियांच्या आयुष्यातील लपलेलं भयानक सत्य त्यामुळे उघड झालं आहे.