Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 216.00
Regular price Rs. 240.00 Sale price Rs. 216.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Shipping calculated at checkout.

Author
Publication
Language
सकारात्मक विचारांचा अवलंब करून आपलं आयुष्य कसं सुधारावं आणि आव्हानांवर मात कशी करावी, हे अनेकांनी आपल्या वागण्यावरून प्रत्यक्ष दाखवून दिलं आहे. अशांपैकीच काही जिगरबाज माणसांनी त्यांच्या स्वतःच्याच शब्दांत लिहिलेले हे त्यांचे अनुभव वाचणाऱ्याला अचंबित करणारे तर आहेतच; शिवाय आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारे आहेत. सकारात्मक विचार तुमचं आयुष्य कसं बदलू शकतात, सुसह्य करू शकतात, हे दाखवून देणाऱ्या या खऱ्या घडलेल्या गोष्टी आहेत. प्रसिद्ध विचारवंत नॉर्मना व्हिन्सेंटपील यांनी मोजक्या आणि चपखल शब्दांत अगदी अचूकपणे सांगितले आहे की, ‘तुमचे विचार बदला आणि तुम्ही तुमचं जगच बदलून टाकाल.’ या पुस्तकातील सत्य गोष्टींमधून सकारात्मक विचारांच्या सामथ्र्यानं जग असं आपल्यापुरतं तरी खरोखरच कसं बदलू शकतं, याचे अगदी साध्या-सोप्या शब्दांत सांगितलेले प्रत्यक्ष अनुभव थक्क करणारे आहेत. अचानक समोर उभ्या ठाकलेल्या आणि आयुष्यच उद्ध्वस्त करायला आलेल्या वेगवेगळ्या प्रसंगांवर, संकटांवर केवळ सकारात्मक विचारांच्या मदतीनं कशी मात करता येते, याची ही चालती-बोलती उदाहरणं सर्वांनीच कायम स्मरणात ठेवायला हवीत आणि स्वतःला ही नेटानं, निश्चयानं सकारात्मक मनोवृत्तीकडे, विचारांकडे वळवण्याचा आणि त्या योगे आपलं आयुष्य आनंदमय, शांततामय करण्याचा सतत प्रयत्न करायला हवा, असा मौल्यवान विचार हे पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनात नक्कीच रुजेल, यात शंका नाही.
View full details