Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
एका सच्च्या समाजवाद्याचं चिंतनशील स्वगत इंग्रजी पेपरवाल्यांनी चंद्रशेखरांना Rugged हे विशेषण बहाल केलं होतं... रांगडा. गडी रांगडा होता, पण मन सुसंस्कृत नि आधुनिक विचारांनी भारलेलं होतं. तरुणपणी कविता केल्या, काही काळ पीएसपीच्या पत्रिकेचे संपादक होते. चंद्रशेखर ग्रामीण होते, गावंढळ नव्हते. त्यांचा देवीलाल झाला नाही. ग्रामीण भागातले असले, तरीही त्यांनी शेतक-यांचा ‘विक्टिम कार्ड’ म्हणून वापर केला नाही. ग्रामीण विकासासाठी व्यापक देशहित आणि समताधिष्ठित, परिवर्तनशील विचारांची बैठक हवी; हे गांधीजींचं सूत्र धरून त्यांनी आपलं राजकारण केलं. अनेक अंतर्विरोधांनी ग्रासलेलं भारताचं बहुआयामी समाजजीवन चंद्रशेखरांनी पुस्तकात सजीव केलंय. ‘जागतिकीकरणाच्या वावटळीत लोकसंस्कृतीची फार मोठी पडझड झाली.’ असं ते म्हणतात. पुस्तकात चंद्रशेखर म्हणतात, `राजकारण सत्यावर चालत नाही हेच खरं.' अंबरीश मिश्र
Share
