Regular price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 90.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
सोळा ते पंचवीस या वयात माणसाचे मन श्रद्धावादी तरी बनते किंवा बुद्धिवादी तरी बनते. बहुतेक व्यक्ती तडजोडवादी वृत्ती स्वीकारतात. म्हणून अंधश्रद्धांचा त्याग करण्यासाठी आवश्यक तो प्रचार कॉलेजमधील युवकयुवतींमध्येच प्रामुख्याने व्हावयास हवा. क्षणोक्षणी मांत्रिकाकडे, गुरूकडे अथवा देवाकडे धाव घेण्याची सवय लागली की, पुरुषार्थ निकालात निघतो, हे त्यांना समजले पाहिजे किंवा समजावून सांगितले पाहिजे. अंधश्रद्धेचे भारताला लागलेले खग्रास ग्रहण श्री. दाभोलकरांच्या प्रयत्नांनी जरी अंशतःच सुटले, तरी ते इष्टच ठरणार आहे. विज्ञानाचा सूर्य माथ्यावर आलेला असताना अंधश्रद्धेची झापडे बांधून ठेचकाळत राहण्यात शहाणपण ते काय ?