Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 360.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 360.00
Sale Sold out

Shipping calculated at checkout.

Author
Publication
Language

'माणसं अगदी सहजतेनं काही माणसांना वेगळं टाकतात. जात-धर्म-रंग भेद… आर्थिक भेद, स्त्री-पुरुष भेद, निरोगी-विशिष्ट रोगांनी पीडित असणा-यांतले भेद... किती तऱ्हांनी विभागून डोकी ’भिन्न’ करतात. पण एका क्षणी आमचं हे वेगळेपणच आमची शक्ती, ऊर्जा, चेतना बनतं. आमच्या प्रत्येक तुकड्यात जीव ओतून एकसंध बनवतं. खरं आहे की, आयुष्याच्या एका टप्प्यावर जगणं निरर्थक वाटू लागतं; त्याच प्रमाणे मरणंही निरर्थक आहे, हे ही पाठोपाठ कळतं. मग आपल्या वाट्याला येणा-या प्रत्येक क्षणाला अर्थ द्यावा, असं वाटतं. जगावं वाटतं. नुसतं जगावं नव्हे, तर चांगलं जगावं असं वाटतं. तेव्हा मात्र या शकलित बुध्दिच्या माणसांपेक्षा आम्ही खरोखरच सर्वार्थानं भिन्न बनतो... 

View full details