Regular price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 144.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
कबीराच्या मते भक्तिसाधनेमध्ये ध्यान आणि प्रार्थनेचं काय स्थान आहे? ध्यान आणि प्रार्थना हे दोन वेगवेगळे मार्ग आहेत. प्रार्थना ही भावदशा आहे; तर ध्यान ही चित्तदशा आहे. प्रार्थनेचा प्रवास हृदयातून सुरू होतो. प्रार्थना हृदयातील प्रेमाला वैयक्तिक पातळीवरून वैश्विक पातळीवर नेते. तेव्हाच प्रार्थना करणारा `मी` संपून जातो. ध्यानाचा उगम मस्तकातून सुरू होतो. ध्यानाने मस्तकातील विचारच संपून जातात. जसजसे ध्यान वाढू लागते तसतशी प्रार्थना प्रकट होऊ लागते आणि जशीजशी प्रार्थना वाढू लागते तसतसे ध्यान प्रकट होऊ लागते. शेवटी असा क्षण येतो की, ध्यान आणि प्रार्थना एकमेकात विलीन होऊन जातात. याच अवस्थेला भक्ती म्हणतात. कबीरांच्या सुंदर आणि भावात्म दोह्यांचे हे ओशोंनी केलेले अत्यंत रसाळ विवेचन या पुस्तकात समाविष्ट केले आहे. भक्ती मार्गावर वाटचाल करणा-यांच्या मनातील प्रश्नांची सविस्तर उत्तरे या पुस्तकातून निश्चितच मिळतील.