Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
‘बेगम बर्वे’ची जन्मकथा सांगितली, तरी नाटकाच्या निर्मितिप्रक्रियेचा संगतवार उलगडा मलाही करता येणार नाही. वाटते की, प्रत्यक्ष कलाकृती निर्मितीच्या कहाण्या ह्या हिमनगासारख्या असतात. नाटककराने त्यांच्या स्पष्टीकरणाचा कितीही प्रयत्न केला, तरी बराच भाग पाण्यातच राहतो. एकूणच रंजनप्रधान रंगभूमीच्या विरूद्ध टोकाला असलेले हे नाटक भारतीय नाटक व रंगभूमीच्या चर्चेच्या परिघात, देशात व परदेशात गेली तीस वर्षे राहिले आणि आता नाटकावर हा टीकाग्रंथही सिद्ध झाला आहे. नाटककाराला तरी यापेक्षा अधिक काय हवे असते? - सतीश आळेकर