Shipping calculated at checkout.
भारतीय पाकविद्येला हजारो वर्षांची परंपरा, इतिहास आहे. हजारो वर्षांपूर्वी भारतवर्ष अत्यंत प्रगत स्थितीत होता. त्यातून अमूल्य अशी ग्रंथसंपदाही निर्माण झाली. बाराव्या शतकात राजा सोमेश्वराने संस्कृतमध्ये लिहिलेला आणि जगातला पहिला ज्ञानकोश म्हणून गणला गेलेला ‘अभिलषितार्थचिंतामणी’ अर्थात् मानसोल्लास हा या ग्रंथसंपदेपैकी एक अमूल्य ठेवा आहे. बाराव्या शतकापर्यंत भारतात अन्न आणि पाणी यांचा कशा प्रकारे विचार केला जात होता आणि अन्न शिजविण्याच्या कोणत्या पध्दती रुढ होत्या तसेच कोणत्या पाककृती केल्या जात असत याबाबत सविस्तर माहिती देऊन त्या वेळचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनही डॉ.वर्षा जोशी आणि डॉ.हेमा क्षीरसागर यांनी या पुस्तकात सांगितला आहे.
आपल्या खाद्यपरंपरेचे महत्त्व आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन सांगणारे, आपल्या जुन्या ग्रंथातील ज्ञान सर्वांपर्यंत पोचवणारे पुस्तक… ‘बाराव्या शतकातील खाद्यसंस्कृती’