Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
संगणक’ या यंत्राची कल्पना बरीच जुनी आहे. नेपियर आणि पास्कल यांच्यासारख्या गणितज्ञांच्या काळापासून सुरू झालेला संगणकाचा प्रवास आज कृत्रिम बुद्धिमतेसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत येऊन पोहोचला आहे. या काळात संगणकाची संकल्पना, त्याचा आकार, त्याच्याशी संबंधित असलेलं सॉफ्टवेअर यांत आमूलाग्र बदल झाले आहेत. सुरुवातीच्या यांत्रिकी तत्त्वांवर आधारित असलेल्या संगणकांचं रूप विजेवर चालणाऱ्या संगणकीय युगानं बदलून टाकलं. त्यानंतर ट्रान्झिस्टर आणि आयसी याच्या शोधांमुळे तर संगणक पार बदलले. छोट्या आकाराचे आणि खूप जास्त क्षमतेचे संगणक तयार झाले. आता तर अनेक जणांच्या मनगटावर छोटा संगणक ‘स्मार्ट वॉच’ च्या रूपानं दिसतो! संगणकाचा हा प्रवास अक्षरश: थक्क करून सोडणारा आहे. या अद्भुत आणि रंजक वाटचालीचे असंख्य शिलेदार आहेत. त्यांच्या अविस्मरणीय आणि काही वेळा अविश्वसनीय कहाण्या आहेत. या तंत्रज्ञानांचा प्रवास समजून घेणसद्ध अत्यंत मनोवेधक आहे. हा सगळा प्रवास अत्यंत सोप्या भाषेत आणि रंजक शैलीत तसंच ओघवत्या पद्धतीनं मांडणारं मराठीमधलं हे एकमेव पुस्तक आहे.