Regular price
Rs. 432.00
Regular price
Rs. 480.00
Sale price
Rs. 432.00
Unit price
/
per
Out of Stock
Shipping calculated at checkout.
बाईचं संघर्षमय जगणं चित्रित करणं मराठी कादंबरीला नवं नाही... पण बायकांचा समूह मात्र क्वचितच कोणी रंगवला ... ‘बाय गं...’ या कादंबरीत लहानशा खेड्यातला बायकांचा समूह आपल्याला भेटतो. त्यांचं एकमेकींशी जोडलेपण कळतं, त्यांचे नित्य नवे प्रश्न उमगतात आणि त्यांचं त्या प्रश्नांना भिडणंदेखील.... लहानसं खेडं ते मुंबई.... डोईवरचा पदर ते जीन्स... कुरडया - शेवया ते नूडल्स... निरक्षर आयाबाया ते वकील, डॉक्टर, इंजिनीअर मुली.. एकत्र कुटुंबाचा सांभाळ ते मोठ्या हॉस्पिटलचं व्यवस्थापन... हा लांब पल्ल्याचा प्रवास.... आणि मुख्य म्हणजे हा सारा प्रवास सजगपणे पाहणारी, विचार करणारी नायिका.... अत्यंत ओघवत्या भाषेतली आणि चित्रमय शैलीतली ही कादंबरी आवर्जून वाचायला हवी..... बाय गं...