Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
आत्मविश्वासाचा जन्म इच्छा आणि स्वप्नांच्या पोटी होत असतो. आपल्याला एखादं काम करण्याची इच्छा होते हे आत्मविश्वासाचे बीज असते. त्याला प्रयत्नाचं खतपाणी घातलं, त्याची प्रयोगशीलतेनं मशागत केली की प्रचंड वृक्षांत रूपांतर होतं.
आपल्याला इतरांच्या आयुष्यातील असा डेरेदार वृक्ष दिसतो. आपण अचंबित होतो. आपल्याकडे असा वृक्ष का बरं बहरलेला नाही असं वाटतं. हेवा वाटतो पण त्या मागची मेहनत आपल्याला दिसत नाही.
अशी मेहनत करायची तयारी असूनदेखील काही वेळा आत्मविश्वास आढळत नाही. याचं कारण, आपण त्यासाठी कोणताच धोका पत्करायला तयार नसतो.
कोणतीही ‘रिस्क’ न घेता भरपूर यश कमावता आलं पाहिजे. असं आपल्याला वाटतं. पण रिस्क घेतल्याशिवाय कसं काय यश मिळणार?
यश मिळाल्याशिवाय आत्मविश्वास तरी कसा वाढणार?
आत्मविश्वास असल्याशिवाय रिस्क तरी कशी घेणार?