Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आधुनिक भारताचा इतिहास आणि त्याचे भवितव्य यांच्याशी जवाहरलाल नेहरूंचे जीवन अतिशय जवळून जोडले गेलेले आहे. ही त्यांची आत्मकथा १९३४-३५ या काळात ते तुरुंगात असताना लिहिली गेली. ती एका व्यक्तीच्या वैयक्तिक कहाणीहूनही अधिक आहे. एका देशात घडून आलेली राजकीय जागृती, ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळवण्याचा त्या देशाने दिलेला लढा हे तर यात दिसून येतेच; पण त्याशिवाय 'आधुनिक समाज' म्हणून स्वतःला घडवण्याचा आणि त्याच बेळी भूतकाळातील सांस्कृतिक आणि आर्थिक बेड्यांपासून सुटका करून घेण्याचा शोधही दिसून येतो.
हे लेखन असामान्य वाक्पटुत्व आणि प्रांजळपणाने लिहिले असून त्यात महात्मा गांधी आणि चळवळीतले अन्य नेते यांचे अत्यंत नेमके वर्णन केले आहे आणि ते करताकरता स्वतः लेखकाचे व्यक्तिचित्रच त्यातून रेखाटले गेलेले आपल्याला दिसून येते. आपल्याला कळून येते की, लेखकाचे व्यक्तिमत्त्व गुंतागुंतीचे आणि आत्मपरीक्षणात्मक आहे, त्यांचे मन अत्यंत बुद्धिमान आणि शोधकवृत्तीचे आहे. त्यांचे निसर्गाप्रति गहन प्रेम, जीवनाची अत्यंत ओढ या गोष्टी आपल्याला यातून दिसून येतातच; पण त्याहूनही अधिक म्हणजे, लोकशाही आणि निधर्मीपणा यांच्याप्रति त्यांची उत्कट बांधिलकी आहे, हेच आपल्याला दिसून येते.
Share
