Regular price
Rs. 307.00
Regular price
Rs. 340.00
Sale price
Rs. 307.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
या विसाव्या शतकानं जगाला बयावाईट अनेक गोष्टी दिल्या असतील; पण त्याची सर्वश्रेष्ठ देणगी म्हणजे त्याने सामान्य मनुष्याला दिलेलं महत्त्व, जे कोणत्या ना कोणत्या दृष्टीने असामान्य आहे. ज्याला आपण जीवन म्हणतो, त्यात अधिक भाग कुणाचा असतो? मूठभर असामान्यांचा की शेकडा नव्वद, किंबहुना शेकडा नव्व्याण्णव असलेल्या सामान्यांचा? आजपर्यंत राजांनी, वीरांनी, संतांनी, तत्त्वज्ञानींनी, कवींनी आणि शास्त्रज्ञांनी या सामान्य मनुष्याला फारसे बोलू दिले नाही. या असामान्यांनी सामान्य मनुष्याला गोड गोड अशी वचने देऊन त्याची प्रत्येक क्षेत्रात कत्तल केली. पण तरीही माणुसकीचा आधार एकच होता; तो म्हणजे संस्कृतीची सारी मूल्ये सांभाळण्याकरिता धडपडणारा, तडफडणारा सामान्य माणूस. ज्याला विशेष चांगले असे काही करता येत नाही; पण वाईट करताना ज्याचा हात कचरल्याशिवाय राहत नाही. हाच सामान्य माणूस या कादंबरीचा नायक आहे. वि.स. खांडेकर यांच्या असामान्य लेखणीतून उतरलेली ही कादंबरी आजच्या सामान्य माणसाची वेदना बोलकी करणारी आहे.
.