Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 126.00
Regular price Rs. 140.00 Sale price Rs. 126.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Shipping calculated at checkout.

Author
Publication
Language
अणुविश्वात डॉ. अनिल काकोडकर यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं, ते त्यांनी केलेल्या भरीव कार्यामुळे. `ध्रुव'सारखी अणुभट्टी कार्यान्वित करणं असो, किंवा पोखरण अणुचाचण्या असोत – डॉ. काकोडकरांनी अशा कितीतरी महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये बहुमूल्य कामगिरी बजावली. एवढंच नव्हे, तर भारत-अमेरिका यांच्यातल्या अणुकराराच्या मसुद्यात देशहिताच्या दृष्टीने आवश्यक ते बदल करून घेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
अणुऊर्जेबरोबरच तंत्रज्ञान-संशोधन या विषयावरही त्यांनी सखोल चिंतन केलं. त्यातूनच भारताला तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात भरारी घ्यायची असेल, तर शिक्षण-व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणं आवश्यक आहे हे त्यांनी ओळखलं. त्यानुसार त्यांच्या संकल्पनेतून `सिलेज', `शिक्षण पंढरी' यांसारखे अनेक उपक्रम राबवले गेले. तसंच एपीजे अब्दुल कलाम यांच्या 'व्हिजन २०२०'नंतर भारताच्या भविष्यकाळातल्या गरजा व विकास विशद करणारं `व्हिजन २०३५' डॉक्यूमेंटही त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केलं. सध्या त्यानुसार अनेक उपक्रम व प्रकल्प राबवले जात आहेत.
अणुविश्वाबरोबरच तंत्रज्ञान-संशोधन आणि शिक्षण या क्षेत्रांत `ध्रुव'पद प्राप्त करणाNया या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीची व कार्याची ओळख करून देणारं हे चरित्र!
View full details