Shipping calculated at checkout.
अंगराज कर्ण ही महाभारतातील सर्वात लोकप्रिय व दिलखेचक व्यक्तिरेखा आहे, परंतु इंद्रायणी सावकारांचा कर्ण रडवा नाही. आपण महापराक्रमी व कुंतीपुत्र म्हणजे क्षत्रिय असूनही त्या उच्चवर्णीय जातीत आपल्याला प्रवेश नाही, या घटनेचे दुःख त्याला निश्चित आहे. परंतु ते त्याने मनाच्या कोपऱ्यात ढकलून दिले आहे. किंबहुना जे दुःख निवारता येत नाही ते विस्मृतीत ढकला आणि आपले जीवन सकारात्मक करा हाच या कर्णाचा संदेश आहे. या कर्णाचा आणखी एक विशेष मनावर ठसतो तो म्हणजे त्याचे वक्तृत्व युक्तिवाद करण्याचे त्याचे कौशल्य. जेव्हा जेव्हा दुर्योधन अडचणीत येतो तेव्हा तेव्हा कर्णाने त्याच्यावतीने जबरदस्त व बिनतोड युक्तिवाद केला आहे. वृषालीची व त्याची प्रेमकथा मनोरंजक आहे. कर्णाने उपस्थित केलेले मुद्दे वाचनीय आहेत. महाभारत हे एक भलेमोठे काव्य आहे. पण घटनाप्रधान आहे. त्या काव्यातील सर्व व्यक्तिरेखांमध्ये लेखिकेने रंग भरले आहेत. सूर्य व इंद्र या देवांच्या स्वभावामधील फरक महाभारतात नाही पण इथे स्पष्ट केला आहे.