Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
'सूर्य का चकाकतो? तारे का लुकलुकतात? ग्रह आडवे तिडवे का फिरतात? ग्रहणे का लागतात? अनादीकाळापासून माणसाला कोडी घालत आहे हे अथांग आकाश. ती कोडी सोडवायला मदत करते विज्ञान आणि तंत्रज्ञान. मूलभूत सैध्दाान्तिंक चौकट पुरवते विज्ञान आणि दुर्बिणी, उपकरणे यांसारखी साधने पुरवते तंत्रज्ञान. शिवाय जुने प्रश्न सोडवताना अवचित नव्याने समोर येणाऱ्या अद्भूत, थरारक गोष्टी- कृष्णविवरे, कृष्णपदार्थ, स्पंदक, क्वेसार... खूप काही दडलेले या आकाशाच्या गूढगर्भामध्ये! आकाशाशी जडले नाते घडवते त्याचेच दर्शन. खगोलविज्ञानातल्या मनोवेधक किश्शांपासून अद्ययावत माहितीपर्यंत... जयसिंहाच्या जंतरमंतरपासून हबल दुर्बिणीपर्यंत... आर्यभटापासून आईनस्टाईनपर्यंत... सचित्र देखण्या पानापानातून घडते ही अवकाशाची सफर. आकाशाशी आपले नाते अधिकच घट्ट करणारे '
Share
