Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
जगाच्या इतिहासाला वर्णभेद, युद्ध, गुलामगिरी यांची एक काळी किनार आहे. वर्णभेदाचा इतिहास तर अगदीच काळाकुट्ट म्हणावा असा; पण यातूनही काही रत्ने झळकली. त्यांच्यामुळे एक नवा आणि आशादायी इतिहास लिहिला गेला. अशा महामानवांत अब्राहम लिंकन यांचं नाव अग्रस्थानी घ्यावं लागेल.
अत्यंत खडतर बालपण गेलेल्या लिंकन यांचा शेतमजूर ते अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष हा प्रवास थक्क करणारा आहे. फर्डे वक्ते, मुत्सद्दी राजकारणी, मानवतावादी राष्ट्राध्यक्ष, लोकशाहीची अजरामर व्याख्या करणारे लिंकन या पुस्तकात आपल्याला भेटतील आणि प्रेरणा देत राहतील याची खात्री वाटते.
कथाकथन प्रकारातील हे पुस्तक लिंकन यांच्या आयुष्याचा रंजक मागोवा घेते. अमेरिकेचे राष्ट्रपिता म्हणून त्यांना का गौरवले जाते याची प्रचीती हे पुस्तक वाचताना नक्कीच येईल.
Share
