Shipping calculated at checkout.
सूक्ष्म संशोधन दाखवते की-हृदयरोग, कर्करोग, मधुमेह
आणि लठ्ठपणाच्या सर्वाधिक घातक दीर्घकालीन रोगांच्या
मुळाशी एक समान कारण आहे
पोषणसंजीनशास्त्र (न्यूट्रिजिनोमिक्स) हे नवे विज्ञान
त्याच्याशी लढा देण्याचा एक खात्रीचा मार्ग आहे.
विज्ञान एका धक्कादायक वस्तुस्थितीपर्यंत पोहोचत आहे. आपल्याला होणाऱ्या बहुतांश घातक रोगांच्या मुळाशी एकसमान कारण आहे, ते म्हणजेः सततचा दाह.
दाह ही आपल्या नैसर्गिक रोगप्रतिकारशक्तीप्रणालीची अतिसक्रिय प्रतिक्रिया आहे.
त्याचा परिणाम पेशी व उती नष्ट होण्यात होतो. आपल्या औद्योगिकीकरण झालेल्या जीवनशैलीने सतत दाह होण्यास चालना मिळते.
त्यामध्ये रसायनांचे सान्निध्य, कृत्रिम अन्नघटक, प्रदूषण व प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचा समावेश आहे.
न्यूजवीक अॅन अंडरवूडच्या बातमीनुसार, “व्यापक दीर्घकालीन आजारपणाच्या रचनेशी संशोधक दाहाचा संबंध जोडत आहेत.” “उच्च रक्तदाबामुळे रुग्णांना अल्झायमेर्स होण्याची जोखीम का वाढते किंवा रुमटॉइड संधिवात झालेल्यांमध्ये अचानक हृदय बंद पडून मृत्यू होण्याचा दर जास्त का आहे, अशी वैद्यकीय कोंडी अचानक सुटत आहे. एका मूलभूत पातळीवर हे सगळे एकमेकांशी जोडलेले आहेत.”
पण दाह आणि त्याबरोबर येणारी दीर्घकालीन आजार होण्याची जोखीम नियंत्रणात ठेवली जाऊ शकते. जीवनशैली आणि पोषणात बदल करणे हा त्याच्या उत्तराचा एक भाग आहे; पण दुसरा भाग पोषणसंजीनशास्त्र (न्यूट्रिजिनोमिक्स) या विज्ञानाच्या सर्वसामान्य माहितीला छेद देणाऱ्या नवीन क्षेत्रात दडलेला आहे. जनुक आणि पोषक घटक यात परस्परक्रिया कशी होते याचे शास्त्र म्हणजे पोषणसंजीनशास्त्र (न्यूट्रिजिनोमिक्स) आयुष्यभर आदर्श आरोग्य राखण्यासाठी डीएनए आणि जननिक सांकेतिक वर्ण यांचा एखाद्या व्यक्तीच्या काही पोषक घटकांच्या गरजेवर कसा परिणाम होतो, याचा हा अभ्यास आहे.
‘आरोग्याचे रहस्य’ या पुस्तकात नऊशे वैज्ञानिक संदर्भासह अद्ययावत विज्ञान संभाषणासारखी लेखनशैली असल्याने वाचकांपर्यंत अतिशय महत्त्वाची माहिती सहज पोहोचते. संशोधन व अद्ययावत विज्ञानात रुची असणाऱ्या डॉक्टरांसाठी आणि आपले आरोग्य सुधारण्याची इच्छा असणाऱ्या सर्वसामान्य वाचकांसाठी यात योग्य, संबंधित माहिती आहे. आरोग्य समजून घेण्याच्या प्रक्रियेत ‘आरोग्याचे रहस्य’ हे पुस्तक मोलाची भर टाकते.