Regular price
Rs. 111.00
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 111.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
मुलं व्हायचीच आणि ती आपोआप वाढायचीच, अशा समजुतीचा काळ आता मागे गेला. पालकांचं काम दिवसेंदिवस अधिकाधिक कौशल्यांची मागणी करणार, असं दिसतं आहे. माझं मूल म्हणजे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ते सगळं मी सांगेन तसं कसं वागेल? मुलांना चांगल्या-वाइटचा विवेक शिकवणं, आत्मविश्वास देणं, निर्णयक्षमता देणं हे आपलं काम आहे. आणि ‘देणं’ असं तरी कसं म्हणावं? ते त्यांना घेता यावं, असं वातावरण निर्माण करणं हे आपलं खरं काम आहे. मुलांचं निरिक्षण करणं, त्यांच्याशी संवाद साधणं, आपल्या मनातलं मोकळेपणानं सांगणं, त्यांच्या मनातलं समजून घेणं, काही विसरणं, काही आठवणीनं उल्लेख करणं, बरंचसं देणं आणि ग्रेसफूली घेणं अशी कितीतरी कौशल्यं आपल्याला यायला हवीत. मुलं वाढवण्याच्या निमित्तानं आपल्याला ही जाग यायला हवी. हे पुस्तक हसत खेळत वाचताना सहजपणे अशी जाग यावी.