Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 89.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 89.00
Sale Sold out

Shipping calculated at checkout.

Author
Publication
Language
पालक होणं ही भावना खूपच विस्मयजनक आणि आनंददायी असली तरी त्याचवेळी त्या भावनेसोबत तुमच्यावर एका नव्या जिवाची संपूर्ण आणि कायमस्वरूपी जबाबदारी आलेली असते.
लेखिका गोपिका कपूर त्यांच्या व्यक्तिगत अनुभवांच्या आधारे आणि त्यांनी केलेल्या वेदांताच्या अभ्यासावर आधारित असे मुलांच्या संगोपनासाठीचे काही सोपे व विचारपूर्ण मार्ग या पुस्तकात देत आहेत.  आजच्या गोंधळलेल्या वातावरणात आध्यात्म, श्रध्दा आणि सद्‍विचारांचे संस्कार याच्या जोरावर गर्भधारणेपासून ते मुलं मोठी होईपर्यंत आपण आपल्या मुलांना 'एक चांगली व्यक्ती' म्हणून कसं घडवू शकतो याची चर्चा लेखिका या पुस्तकाद्वारे करते.
*  गर्भधारणेदरम्यान कोणती काळजी घ्यावी? 
*  ‘आई-वडील’ या नात्याचा मुलांसमोर कसा आदर्श ठेवता येईल?
*   स्वत:च्या क्रोधावर कसं नियंत्रण ठेवता येईल?
*   मुलांना दर्जात्मक वेळ कसा देता येईल?
*   मुलांचे वाढदिवस कसे साजरे करावेत?
*   मुलं वाढवताना तुमचा दृष्टिकोन कसा असावा?
पालकांना भेडसावणाऱ्या अशा अनेक मुद्यांची चर्चा पुस्तकात वाचायला मिळेल. त्याचबरोबर मुलांच्या भावविश्वाचा आणि भविष्याचा विचार करून समजूतदार पालकाची भूमिका निभावण्यासाठी हे पुस्तक उत्तम मार्गदर्शन करेल.
View full details