Shipping calculated at checkout.
आपल्याला कोणताही विकार नसला तरी शरीरस्वास्थ्य राखणे, स्थूलता टाळणे आणि शरीरयष्टी प्रमाणबद्ध ठेवणे केव्हाही चांगलेच आहे. यासाठी उत्तम उपाय म्हणजे आहारनियमन अर्थात डायटिंग! परंतु डायटिंग करताना आपल्या खाण्यातून काही आवश्यक अन्नघटक कमी पडून शारीरिक संतुलन बिघडू शकते व इतर काही समस्यांना तोंड देण्याची वेळ येते. मात्र वगळावे लागतील असे पदार्थ थोडया वेगळ्या पद्धतीने केल्यास या पदार्थांच्या सेवनाचा आनंद कायम राहून अन्नघटकांचे संतुलनही राखता येईल.
उषा पुरोहित यांनी शरीराला आवश्यक उष्मांक आणि आरोग्य-घटकांचा विचार करून, नेहमीच्या पद्धतीत बदल करून यात सर्व प्रकारच्या पदार्थांच्या कमी उष्मांकाच्या पाककृती दिल्या आहेत. आहारातील वैविध्य कायम ठेवून यात चविष्टपणा राखूनही आहार-नियमन साधणार्या या पाककृती सर्वांनाच फलदायी ठरतील!