Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out

Shipping calculated at checkout.

Condition

फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ना सर्व वयोगटातील वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने ‘रोहन प्रकाशन’ घेऊन आलं आहे – फेलूदाच्या एकूण ३५ कथांपैकी शेवटच्या ११ थरारक कथांचे ४ नवीन संग्रह; त्यातल्या या 3 कथा…
१.सुनील तरफदार यांचा जादूचा कार्यक्रम, त्यातल्या ‘ज्योतिष्का’ उर्फ़ नयन या लहान मुलामुळे चांगलाच गाजू लागतो. नयनच्या अफाट बुद्धिक्षमतेमुळे तो नोटांवरचे क्रमांक, खिशातले पैसे असे कोणतेही आकडे झटक्यात अचूक सांगू शकत असतो. हे समजताच त्याच्या मालकीसाठी काही धनाढ्य माणसं वाट्टेल ते करायला तयार होतात, आणि अचानक नयन गायब होतो! आणि नयनचं रहस्य अधिकच गहिरं होत जातं…
२.ब्रिटिशकाळात भारतात सैनिक असलेल्या पीटरच्या आजोबांनी एका लुटीत एक माणिक घेतलेलं असतं. ते तो कलकत्त्याच्या संग्रहालयाला परत करण्यासाठी भारतात, आपल्या मित्रासोबत आलेला असतो. त्याच्याशी बोलताना फेलूदाला असं कळतं की, त्या माणकावर काही लोकांचा डोळा असून त्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत… फेलूदाला रॉबर्टसनचं माणिक सुरक्षित ठेवता येईल?
३.जादूगार सोमेश्वर बर्मन यांनी गावोगावी जाऊन जादूचे प्रयोग केलेले असतात, त्याबद्दलची माहिती गोळा करून त्याचं संकलन केलेलं असतं. हे संकलित हस्तलिखित एका जादूगाराला विकत घ्यायचं असतं. त्याबद्दल सल्ला घेण्यासाठी ते फेलूदाकडे येतात. अन् अचानक बर्मन यांच्याकडे असलेल्या एका ‘मौल्यवान’ गोष्टीचं इंद्रजाल रहस्य समोर येतं…!

View full details