Shipping calculated at checkout.
ही कथा केवळ एका गावाची नाही!
ती आहे, रम्य आणि सुखद आठवणींची…
लहानशा गावात सहज मिसळून गेलेल्या एका कुटुंबाची ही कथा कुटुंबातल्या मुलीच्या आठवणींतून उलगडत जाते. जात, धर्म, पंथ या गोष्टींचा जाच होऊ न देता सुखं-दुःखं, मान-अपमान, सण-उत्सव, भांडण-तंटे अशा सगळ्या गोष्टी एकत्र येऊन वाटून घेत माणुसकी आणि आपलेपणा जिता-जागता ठेवणाऱ्या गावातल्या आयुष्याच्या या आठवणी निरलस वृत्तीचं दर्शन वाचकाला घडवतात. द्वेष आणि मत्सराचे वारे न लागलेल्या काळात, तांत्रिक सुविधांचा सुकाळ नसताना छोट्याशा गावातली माणसं एकमेकांना कशी धरून राहत होती, एकमेकांच्या चुकांसह किती सहजपणे एकमेकांना स्वीकारत होती, याची ही गोष्ट!
सादगी, निर्लेप वृत्ती आणि जिव्हाळा या गोष्टींच्या आधारावर सकस आणि सुंदर जीवन जगलेल्या गावाच्या पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटणाऱ्या या आठवणी! मुक्काम पोस्ट शहापूर!