Shipping calculated at checkout.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम है एक वैज्ञानिक, लेखक, कवी, शिक्षक, दूरदर्शी आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती होते आणि त्याहीपेक्षा खूप काही होते. अलीकडील काळातील सर्वात प्रिय आणि प्रशंसनीय पुरुषांपैकी एक असलेले डॉ. कलाम हे दयाळू आणि सौम्य माणूस होते. ज्यांचा भारताच्या लोकांवर विशेषत: तरूणांच्या सामर्थ्यावर दृढ विश्वास होता. एक असा माणूस होता जो अकल्पनीय उंबीवर पोहोचला परंतु त्यांचे पाय हे नेहमी जमिनीवरच होते. ज्या माणसाने ज्याला स्पर्श केला त्या प्रत्येक गोष्टीत स्वतःची उत्कृष्टता आणि आणि नम्रता आणली. त्यानेच आपल्याला समर्पण आणि परिश्रम करण्याच्या शक्तीचे दर्शन दिले त्याने आपल्याला स्वप्नांची शक्ती दाखवून दिली. ते म्हणयचे, “स्वप्ने ती नाहीत जी आपण झोपेमध्ये पाहतो. स्वप्ने म्हणजे ती जी आपल्याला झोपू देत नाहीत.’ त्यांची जीवनकहाणी याचीच साक्ष देते.