Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
“आपलं विश्व आणि त्याची नवलकथा’ या आगळ्यावेगळ्या सचित्र ग्रंथात सुकल्प कारंजेकर यांनी विश्वाच्या उत्पत्तीपासून त्याच्या भवितव्यापर्यंत विविधांगी विश्ववेध घेतलेला आहे. विश्वशास्त्रासारख्या अद्भुत विषयाचा हा सुबोध, पण अभ्यासपूर्ण परिचय आहे. त्याला विज्ञानाची बैठक आहे, पण त्यात कथनातील कोरडेपणा वा तंत्रशरणता नाही. केवळ विज्ञानाच्या नव्हे, तर साहित्य-तत्त्वज्ञानाच्या अंगानेसुद्धा हजारो वर्षांची विश्वकहाणी ते रंजक पद्धतीने मांडत जातात. या मांडणीत आंतरविद्याशाखीयतेचा प्रत्यय येतो. नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार ग्रंथनिर्मितीवर भर देणाऱ्या ‘रोहन प्रकाशना’ने हाती ठेवलेली ही ‘सुकल्पित’ नवलकथा खचितच वाचक- विश्वाच्या पसंतीला उतरेल.
-राजा दीक्षित
सुप्रतिष्ठित प्राध्यापक (Emeritus Professor)
अध्यक्ष व प्रमुख संपादक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
विश्वाचा उगम कसा झाला असेल ?
विश्वाच्या या अफाट पसाऱ्यात आपलं स्थान काय ? हे प्रश्न हजारो वर्षांपासून माणसाच्या सोबत आहेत.
त्याची उत्तरंही वेगवेगळ्या संस्कृती सभ्यतांमध्ये उत्पत्तीकथांमार्फत द्यायचा प्रयत्न झाला, तर आधुनिक काळात माणसाने ही कोडी विज्ञानाच्या साहाय्याने सोडवली…. आणि अजूनही ही प्रक्रिया सुरूच आहे…..
थोडक्यात, विश्व समजून घेण्याचा माणसाचा प्रवास हजारो वर्षांपासूनचा आहे.
या प्रवासाचीच ही उद्बोधक गोष्ट….
कुमारांपासून मोठ्यांपर्यंत; सगळ्यांचं कुतूहल शमवणारं….
मायमराठीत, सोप्या पद्धतीने अनेक वैज्ञानिक संकल्पना समजावून सांगणारं…
रंजक आणि तितकीच सखोल माहिती देणारं…
आपल्याकडे असलंच पाहिजे असं ‘मस्ट रीड’ पुस्तक… आपलं विश्व
Share
