Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 450.00
Regular price Rs. 500.00 Sale price Rs. 450.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Shipping calculated at checkout.

Condition
सीरिअल किलर्सना पकडण्यात नावाजलेली एफबीआय एजंट स्मोकी बॅरेटची नवी साहसकथा. ``मला स्मोकी बॅरेटशी बोलू द्या, नाहीतर मी स्वत:लाच गोळ्या घालून घेईन.’` सोळा वर्षांची सारा कानशिलावर पिस्तूल ठेवून स्मोकीची वाट पाहतेय. तिच्या घरात तीन खून पडलेत आणि ते खून आपल्याला अनेक वर्षांपासून त्रास देणा-या अनोळखी खुन्याने केलेत, असे तिचे म्हणणे आहे. पण तिच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. आजपर्यंत कोणीही नाही.... एफबीआयच्या लॉस एंजलिसमधील शाखेच्या गुन्हे विभागाची प्रमुख स्मोकी बॅरेट आणि तिच्या टीममधल्या हुशार माणसांवर या गुन्ह्याच्या तपासाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास जिद्दीने करण्यामागे स्मोकीची वैयक्तिक कारणंही आहेत. आपल्या कुटुंबाच्या हत्याकांडातून सावरत असतानाच दत्तक घेतलेल्या मुलीसोबतचं नवं आयुष्य तिला आता शांततेत व्यतीत करायचंय. साराचं काय होणार? भूतकाळातल्या भयंकर जखमा मनावर वागवणारी स्मोकी आपलं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करेल? खुन्याचे इरादे यशस्वी होतील की स्मोकी आणि तिच्या टीमचे प्रयत्न? जीवन-मरण, आशा-निराशा... मानवी-पाशवी या वृत्तींमधला संघर्ष पानापानांवर मांडणारी, एक संवेदनशील थ्रिलर स्टोरी.
View full details