Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
सलग सात वेळा कर्नाटक विधानसभेवर निवड, तेरा वर्षे मंत्रिपद आणि एकदा लोकसभेवर निवड अशी श्री. एम. वाय. घोरपडे यांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द. `स्मरणयात्रेच्या वाटेवर' या त्यांच्या आठवणी म्हणजे संपत्ती, संधी आणि सत्ता व्यापक जनहितार्थ कशा सत्कारणी लावायच्या, याचा वस्तुपाठच! राजकारणाकडे अंत्योदयाचे साधन म्हणून बघणा-या श्री. घोरपडे यांनी आपली सारी राजकीय कारकीर्द सत्तेचे विकेंद्रीकरण, ग्रामसुधार, शिक्षण, रोजगारनिर्मिती आणि स्त्री-सक्षमीकरण यासाठी वेचली. ग्रामकेंद्री विकासाचे उद्दिष्ट साध्य व्हावे, यासाठी पंचायत राज यंत्रणेच्या संरचनेत मोलाचे योगदान दिले. सुधारित शेती प्रयोगांपासून ते अवजड उद्योगांपर्यंत आणि वन्यजीवन छायाचित्रणापासून ते लेखनापर्यंत अनेक क्षेत्रांत कार्यरत राहून श्री. घोरपडे यांनी एक संतुलित, उन्नत आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आयुष्य कसे जगावे, याचे उदाहरण घालून दिले आहे. त्यांचा जीवनपट आणि आठवणी सर्वच क्षेत्रांतील तरुणांना प्रेरणादायी ठरतील. स्मरणयात्रेच्या वाटेवर