Shipping calculated at checkout.
प्रसिद्धीचे वलय सदैव ज्या शास्त्रज्ञांभोवती राहिले, त्यातील पहिला शास्त्रज्ञ होता आईनस्टाईन, तर दुसरे नाव होते रिचर्ड फाईनमन! आईनस्टाईननंतर फिजिक्स ज्या टप्प्यावर काही काळ थांबलं होतं, त्या टप्प्यावरून फिजिक्सला पुढे नेण्यामध्ये रिचर्ड फाईनमन यांचा सिंहाचा वाटा होता. ते द्रष्टे शास्त्रज्ञ होते. नॅनो टेक्नॉलॉजीच्या तंत्राची चाहूल त्यांनी अनेक वर्षे आधीच युवा शास्त्रज्ञांना दिली होती. अणुबॉम्बच्या चाचणीचा स्फोट गॉगल न घालता, केवळ उघड्या डोळ्यांनी पाहणा-या या शास्त्रज्ञाने आपले संपूर्ण जीवन, असे उघड्या डोळ्यांनीच व्यतीत केले. प्रतिष्ठा, पदव्या आणि मानसन्मान निग्रहाने नाकारून सदैव भौतिकशास्त्राचेच सेवाव्रत अंगीकारले. संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील आपला प्रामाणिकपणा सातत्याने टिकवत असतानाच, जीवनातील विविध अनुभवांना एका निखळ मिश्कीलतेने फाईनमन सामोरे गेले. विज्ञान क्षेत्रात चिकित्सक वृत्ती जागृत ठेवणारे शिक्षण, हेच खरे शिक्षण असे मानून त्याचा पाठपुरावा विद्याथ्र्यांना करायला लावणारा हा शास्त्रज्ञ म्हणजे बुद्धिमत्ता, सचोटी आणि विज्ञाननिष्ठेचे अजब रसायन होता.