Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 432.00
Regular price Rs. 480.00 Sale price Rs. 432.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Shipping calculated at checkout.

Condition
हॅरी क्लिफ्टनच्या जीवनाची ही लोकविलक्षण कहाणी १९२० साली सुरू होते. तेव्हा हॅरीच्या तोंडचे शब्द असतात, ``माझ्या वडिलांना युद्धात लढताना मरण आलं, असं मला सांगण्यात आलं आहे.`` मात्र आपल्या वडिलांना प्रत्यक्षात कशाप्रकारे, कोणत्या परिस्थितीत मृत्यू आला, हे सत्य हॅरीला समजण्यासाठी तब्बल वीस वर्षांचा कालावधी जावा लागतो. त्यातून एक नवाच प्रश्न त्याच्यासमोर उपस्थित होतो– `खरंच आपले वडील नक्की कोण होते?` हॅरी हा ब्रिस्टॉलच्या बंदरात काम करणाऱ्या एका सामान्य गोदीकामगाराचा मुलगा आहे की वेस्ट कंट्रीमधल्या समाजातील एक खानदानी, प्रतिष्ठीत धनवंताच्या पोटी त्याचा जन्म झालेला आहे? खरंच तो बॅरिग्टन शिपिग लाइन्सच्या मालकाचा मुलगा असेल का? `ओन्ली टाइम विल टेल` या पुस्तकात १९२० ते १९४० या कालावधीचा आढावा घेण्यात आला आहे. या कथानकातील व्यक्तीरेखा संस्मरणीय आहेत. या पहिल्या खंडात पहिल्या महायुद्धापासून ते दुसऱ्या महायुद्धाच्या आरंभापर्यंतचा कालखंड चित्रित करण्यात आला आहे. याच वेळी हॅरीपुढे दोन पर्याय उभे राहतात– एकतर उच्च शिक्षणासाठी ऑक्सफर्डला जाऊन राहायचं किंवा हिटलरच्या जर्मनी विरुद्ध युद्धात उतरायचं. हे पुस्तक वाचकाला एका प्रदीर्घ प्रवासाला घेऊन जातं. हा प्रवास इतका रोमहर्षक आहे की, तो संपूच नये, असं वाटतं. या अविस्मरणीय कहाणीचं शेवटचं पान वाचक जेव्हा वाचून संपवतो, तेव्हा एक भलंमोठ्ठं प्रश्नचिन्ह कथानायक हॅरी क्लिफ्टनच्या समोर आणि त्याचबरोबर वाचकांच्याही समोर उभं ठाकतं...
View full details