Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 126.00
Regular price Rs. 140.00 Sale price Rs. 126.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Shipping calculated at checkout.

Condition

मराठेशाहीतील काही निवडक कर्तबगार-कर्तृत्ववान स्त्रियांचा परिचय डॉ. सुरेश देशपांडे यांनी अस्सल ऐतिहासिक साधनांचा विशेषत: तत्कालीन पत्रांचा धांडोळा घेऊन देण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात केला आहे. या सर्व स्त्रियांबद्दल मराठा मंडळात मोठा पूज्यभाव होता; तथापि राजवैभव पायाशी लोटांगण घालत असतानासुद्धा नियतीने प्रत्येकीच्या जीवनात अनेक खडतर प्रसंग उभे केले. या प्रसंगांच्या वेळची त्यांची सोशिकता, सहनशीलता, प्रसंगावधान आणि नियतीवर मात करण्याची जबरदस्त जिद्द व महत्त्वाकांक्षा त्यांच्या जीवनचरित्रातून पाहावयास मिळते. डॉ. सु. र. देशपांडे यांनी अतिशय सोप्या, साध्या व ओघवत्या भाषाशैलीत, ऐतिहासिक दाखले देत ही जीवनचरित्रे शब्दबद्ध केली आहेत. उत्तर पेशवाईतील बखरकारांनी मस्तानी-आनंदीबार्इंसारख्या स्त्रियांना खलनायिका बनविले; मात्र तत्कालीन अस्सल पत्रव्यवहार आणि परिस्थितीजन्य पुरावा पाहता, या स्त्रियांवर इतिहासकारांनी अन्याय केल्याचे जाणवते. याचा परामर्श लेखकाने तत्कालीन ऐतिहासिक दाखले देऊन घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच करवीरच्या जिजाबार्इंची स्वाभिमानी कारकीर्द आणि त्यांनी कोल्हापूर संस्थानच्या संरक्षण-संवर्धनासाठी केलेली खटपट प्रस्तुत पुस्तकात प्रथमच सविस्तर आली आहे. यापूर्वी एखादा अपवाद वगळता या महाराणीवर स्वतंत्ररीत्या कुणी फारसे लिहिले नाही. तसेच शिवमाता जिजाबाई, महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई या शिवकालाशी निगडित असलेल्या स्त्रियांविषयी काही नवीन माहिती उजेडात आली आहे. तिचा डॉ. देशपांडे यांनी परामर्श घेतला आहे. त्यामुळे इतिहासप्रेमी व इतिहास विषयाच्या विद्यार्थी वर्गाला आणि अभ्यासकांना हा ग्रंथ खचितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो.

View full details