Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 108.00
Regular price Rs. 120.00 Sale price Rs. 108.00
Sale Sold out

Shipping calculated at checkout.

Author
Publication
Language
दिलीप प्रभावळकर म्हणजे अभिनयनिपुण सव्यसाची कलावंत! हा कलावंत एक सिद्धहस्त लेखकही आहे, हे त्यांचं लेखन वाचल्यानंतर प्रकर्षानं जाणवतं. प्रभावळकरांचा विनोद हा गुदगुल्या करणारा, गालातल्या गालात हसवत प्रसन्न करणारा आहे. या विनोदाचं वैशिष्ट्य हेच की, तो कुठलीही झूल अंगावर घेत नाही की, विदूषकी पोझ घेत नाही. स्वत: प्रभावळकरच एका मुलाखतीत म्हणाले होते की, ‘मी जेव्हा नाटकात काम करतो, तेव्हा नेहमीच्या जगण्यातले मुखवटे काढून बाजूला ठेवतो.’ त्यांच्या लेखनाबद्दलही हेच म्हणता येईल. ते जेव्हा लिहितात, तेव्हा मुखवटेरहित होऊन लिहितात. सामान्य माणसाला थेट भिडण्याचं सामथ्र्य आणि प्रांजळपणा हे प्रभावळकरांच्या विनोदाचं बलस्थान आहे. - जयन्त पवार साहित्य परिषदेचा ‘चिं. वि. जोशी’ पुरस्कार 
View full details