Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Shipping calculated at checkout.

Author
Publication
Language
मधुमेहासंबंधी सर्वांच्या मनातील गुंता हलक्या हाताने सोडवून अथ ते इति मार्गदर्शन करणारे पुस्तक. मधुमेहाविषयी सर्वसमावेशक दृष्टिकोण डोळ्यांसमोर ठेवून या पुस्तकाची व्याप्ती ठरवली आहे. मधुमेह म्हणजे काय? या मुद्यापासून प्रारंभ होणाऱ्या या पुस्तकात मधुमेहाविषयीचे सर्व पैलु साकल्याने सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रत्येक व्यक्तीत एक अवखळ मूल दडलेले असते, त्याला बंधने नको असतात. तुम्ही हे खाऊ नका, असे करू नका असे म्हटले की हे मूल बंड करून उठते आणि मग नेमके तेच करायला लागते. बरेच प्रौढ, वृद्ध मधुमेही घरच्यांची नजर चुकवून गोड खाणारे तुम्हीही पाहिले असतीलच पण जर हेच शास्त्रीय आधार घेऊन ते न खाणे का जरुरी आहे असे सांत्वन दिले म्हणजे आपोआप आत्मसंयमन वाढायला लागते.
केवळ मधुमेही रुग्णांपुरतीच या पुस्तकाची उपयुक्तता मर्यादित नाही तर असे समजले जाते की सामान्य व्यक्तीसाठीही हे आहार व्यायामाचे आचरण आदर्श आहे. या पुस्तकाला केवळ वैज्ञानिक तथ्यांचा जडपणा येऊ नये याचीही काळजी घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला गेला आहे. जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले गेले आहेत.
मधुमेहाविषयी संपूर्ण मार्गदर्शन करून त्यांचे जीवनमान सुखावह करणारे पुस्तक वाचकांच्या हाती देताना मनस्वी आनंद आणि समाधान वाटत आहे.
View full details