Out of Stock
Shipping calculated at checkout.
“योग्य माहिती, योग्य वेळी, योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचविणे” हा शिवरायांनी माझ्या गुप्तहेर पथकासाठी घालून दिलेला दंडक मी हयातभर कधीच मोडला नाही, आणि आज हयात नसताना देखील तो मी मोडणार नाही. माझ्या राजांचा आदेश मानूनच आज मी बोलणार आहे... सर्व काही सांगणार आहे... स्वतःचे चरित्र स्वमुखाने सांगावे असा मी कोणी महानायक किंवा युगपुरुष नाही, इतिहास कथन करू शकेल असा इतिहासकार तर मुळीच नाही. परंतू इतिहासाचे आणि जवळपास सर्वच दोस्त दुष्मनांचे भेद जाणणारा, आणि इतिहासाच्या पानांना माहित नसलेला गूढ इतिहास डोळ्यांनी अनुभवलेला गुप्तहेर नक्कीच आहे. इतिहासाने या बहिर्जी ची नोंद ठेवली नाही, ठेवू शकणार हि नाही. कारण इतिहास कधीच गुप्तहेराचा साक्षीदार नसतो. परंतू हा गुप्तहेर बहिर्जी नाईक शिवकालीन इतिहासाचा सर्वात मोठा साक्षीदार आहे...
बहिर्जी नाईक
बहिर्जी नाईक म्हणजे अफाट साहस
बहिर्जी नाईक म्हणजे महाकाय पराक्रम
बहिर्जी नाईक म्हणजे बेजोड बुद्धीचातुर्य
बहिर्जी नाईक म्हणजे निखळ प्रसंगावधान
बहिर्जी नाईक म्हणजे अद्वितीय स्वामिनिष्ठा
बहिर्जी नाईक म्हणजे इतिहासातील गूढ महापर्व
हे गूढ पर्व स्वतः बहिर्जी नाईक उलगडून सांगतील तर...
शिवकालीन इतिहासाचा हा अद्भुत, अविश्वसनीय, थरारक, जादुई, मन सुन्न करणारा आणि अंतर्मुख करून हादरवून सोडणारा अनुभव घेण्यासाठी वाचा