Out of Stock
Shipping calculated at checkout.
महाराष्ट्राचे व्यक्तिमत्त्व आणि संस्कृती समृद्ध, संपन्न करणारा घटक म्हणजे मूर्तिशास्त्र होय. मूर्ती काय करीत नाहीत? मूर्ती प्रेरणा देतात, मूर्ती भक्ती जागृत करतात, मूर्ती सामाजिक अभिसरण आणि सामाजिक वर्तनावर प्रकाश टाकतात, मूर्ती नैतिक मूल्ये शिकवितात, मूर्ती पौराणिक कथा, तत्त्वज्ञान, तत्त्वमीमांसा तसेच आध्यात्मिक विचारांना मूर्त रूप देतात. थोडक्यात काय तर महाराष्ट्र हा आपल्यासमोर विविध रंगछटा आणि काही अद्वितीय अशा संकल्पनांनी भरलेल्या दुर्मीळ, असामान्य आणि अद्वितीय मूर्तीचा एक सुंदर कॅलिडोस्कोप सादर करतो.
महाराष्ट्रात आढळणाऱ्या खास वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती अखंड भारतात अन्यत्र कोठेही नाहीत. प्रतिमाशास्त्रावर आधारित महाराष्ट्राचा हा मागोवा त्याच्या चारित्र्याचे ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक असे जवळजवळ प्रत्येक आयाम पुढे आणतो. मूर्तीमध्ये दडलेले विविध आकृतिबंध उजेडात येऊ लागले की जणू काही आपला आत्माच आपल्यासमोर उघड झाल्याची भावना निर्माण होते. हा अनुभव फार रोमांचकारी असतो. दुर्मीळ, वैशिष्ट्यपूर्ण आणि अप्रचलित मूर्तीच्याद्वारे महाराष्ट्राचा ऐतिहासिक, धार्मिक आणि सांप्रदायिक अभ्यास यथाशक्ती, यथामती मांडण्याचा हा प्रयत्न अभ्यासकांना, वाचकांना मान्य व्हावा अशी अपेक्षा आहे