Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
मकरंद सराटे हा शेतकरी कुटुंबातला तरुण प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून प्राध्यापक होतो. नोकरीच्या ठिकाणी संसार थाटतो. गावाकडच्या माणसांकडून दुखावल्याची भावना झालेल्या त्याच्या बायकोने स्वतःच्या संसारापुरतं पाहणं आणि याने गावाकडच्या माणसांसाठी ओढ घेणं यातून कौटुंबिक पातळीवर जे ताणतणाव निर्माण होतात, ते मकरंद सराटेचे एकट्याचे राहत नाहीत. खेड्यातून शहरात आलेल्या प्रत्येक तरुणाच्या आयुष्यातील प्रातिनिधिक ताणतणावांचे स्वरूप त्याला प्राप्त होते. त्या अर्थाने ही कादंबरी साठनंतरच्या काळात शिकून नोकरीसाठी गाव सोडलेल्या काही पिढ्यांची प्रातिनिधिक कादंबरी ठरते. 'स्व'च्या अस्तित्वाच्या संभ्रमाची उत्तरे 'स्वेतरां'च्या जगण्यामध्ये शोधणे तसेच लोकपरंपरा आणि लोकसंस्कृतीच्या संदर्भात स्वतःचे जगणे ताडून पाहणे, यामुळे कादंबरीला व्यापक परिप्रेक्ष्य प्राप्त होते. खेडी, निमशहरे आणि शहरांच्या पातळीवर झालेली स्थित्यंतरे; जागतिकीकरणाचे कुटुंबव्यवस्थेवर आणि मानवी नातेसंबंधांवर झालेले परिणाम, त्यातून संवेदनशील व्यक्तीला वेटाळून राहणारे प्रश्न याचे अस्वस्थ करणारे चित्रण करणारी ही कादंबरी आजच्या एकूण मराठी कादंबरीविश्वामध्ये महत्त्वाची ठरते.