1
/
of
1
Regular price
Rs. 288.00
Regular price
Rs. 320.00
Sale price
Rs. 288.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
स्वामी विवेकानंद या नावाचा केवळ उच्चारच आपल्याला एका उदात्त, उत्तुंग आणि उन्मनी अवस्थेत घेऊन जातो. त्यांच्या जीवनाचा वेध घेणे म्हणजे भारतीय संस्कृती, तिचे नैतिक अधिष्ठान, तिची जीवनमूल्यपध्दती यांचा अभ्यासच आहे. त्यांनी दिलेला सहिष्णुतेचा संदेश ख-याखु-या ज्ञानाचा आविष्काराचा आहे. त्यामुळे स्वामीजी या देशाचा एक आदर्श, अनुकरणीय प्रवक्तेच टरतात. त्याशिवाय, आपल्या सभोवतालच्या तळागाळातील जनसामान्यांच्या कल्याणासाटी संन्याशांचा संप्रदाय निर्माण करण्याचे जे व्रत त्यांनी घेतले त्यामुळे स्वामी विवेकानंद एक महान प्रेषित व असाधारण लोकाग्रणी टरतात. आजघडीला तर त्यांच्या शिकवणुकीतील यथार्थता बावनकशी सोन्यासारखी वाटते. आज भारतातील राजकीय, सामाजिक व आर्थिक वातावरण इतके गलिच्छ व गढूळ झालेले आहे, धार्मिक असहिष्णुता आणि माथेफिरुपणा इतक्या टोकाला आहे की ‘यदा यदा हि धर्मस्य..’ या भगवद्गीतेतील वचनाप्रमाणे स्वामी विवेकानंदासारख्या महापुरुषाने पुन्हा एकदा भारतात अवतार घेऊन आपल्या देशाला-नव्हे संपूर्ण जगाला या वाढत्या प्रक्षोभातून सुखरुप बाहेर आणावे असे उगीचच वाटत राहते.
Share
